[pune] - इंटरसिटी एक्सप्रेस दीड महिन्यासाठी रद्द

  |   Punenews

पुणे :

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दौंड आणि कुर्डुवाडीदरम्यान घेण्यात येणाऱ्या ‘ब्लॉक’मुळे पुणे - सोलापूर - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस (१२१६९) १६ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. इंटरसिटी एक्सप्रेस तबब्ल दीड महिना धावणार नसल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल होणार आहे. सोलापूर विभागातील ब्लॉकमुळे पुणे - सोलापूर - पुणे इंटरसिटी (१२१७०) बरोबरच हैदराबाद - पुणे आणि पुणे - हैदराबाद या एक्सप्रेसच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. हैद्राबाद - पुणे एक्सप्रेस ३१ मार्चपर्यंत हैद्राबाद ते कुर्डुवाडी तर पुणे - हैद्राबाद एक्सप्रेस १ एप्रिलपर्यंत कुर्डुवाडी ते हैदराबाद अशी धावणार आहे. या दोन्ही एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस धावतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने कळिवली आहे.

फोटो - http://v.duta.us/-SQscQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/r4a8DwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬