[pune] - एसटीतील वायफाय सेवा बंद

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली वाय-फाय सेवा काही दिवसापासून बंद असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत. एसटी प्रवाशांची संख्या वाढावी, प्रवाशांचा प्रवास रंजक व्हावा यासाठी महामंडळाने यंत्र मीडिया सोल्यूशन या खासगी कंपनीच्या माध्यमातून ताफ्यातील तब्बल १८ हजार गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा सुरू केली होती. त्यानंतर ‘एसटीचा प्रवास; मनोरंजन हमखास,’ अशी जहिरातबाजीही महामंडळाने केली. मात्र, काही दिवसांतच अनेक गाड्यांमधील वाय-फाय बंद पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक स्मार्टफोनधारक प्रवाशाला प्रवास करताना मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने आपल्या ताफ्यातील सर्व गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सुरुवातीच्या काळात पुणे विभागातील ५० गाड्यांमध्ये प्रयोगिक तत्त्वावर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महामंडळाच्या सर्वच्या सर्व म्हणजेच १८ हजार गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा सुरू झाली. मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, चित्रपटातील गाणी, लहान मुलांसाठी कार्टून नेटवर्क चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांचा खजिना याद्वारे प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. तसेच, प्रवाशांमध्ये वाय-फाय सेवेचा लाभ घेताना एखाद्या प्रवाशाला ठरावीक चित्रपट, चित्रपटगीत आणि मालिका पुन्हा पाहण्यासाठी वाय-फाय मेन्यूद्वारे ‘एसएमएस’ करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक गाड्यांमधील वाय-फाय सुविधा बंद असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत. इंटरनेट सुरू केल्यानंतर कनेक्ट होत नाही. मोबाइलवर वाय-फाय कनेक्ट झाल्याचे चिन्ह दिसते; मात्र वेब सर्चिंग होत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या....

फोटो - http://v.duta.us/gqfyjgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/rRWV2QAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬