[pune] - झाडू निर्मीतीतून दहा लाखांचे उत्पन्न

  |   Punenews

‘मटा’ विशेष

संदीप भातकर, येरवडा

येरवडा येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रातील भिकाऱ्यांनी झाडू आणि खराटे तयार करून गेल्या तीन वर्षांत सरकारला दहा लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. यातून सव्वा तीन लाखांचा नफा झाला आहे. मात्र, सरकारला लोखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या भिक्षेकऱ्यांना स्वीकार केंद्रातून एक रुपयाही मिळत नाही.

रस्त्यावर आणि महत्त्वाच्या चौकात भिक मागून भिकारी उदरनिर्वाह करतात. भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकारची असल्याने राज्यात वेळोवेळी भिक्षेकरी मुक्त अभियान राबविले जाते. भिक्षा प्रतिबंध अधिनियम कलम ४ (१) नुसार भिक मागताना आढळून आल्यास पोलिसांकडून कारवाई होते. महिला व बाल कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेले भिक्षेकरी केंद्राचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने अभियान राबविले जाते. पुणे शहरात या अभियानांतर्गत पकडणाऱ्या भिकाऱ्यांना येरवडा येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात ठेवले जाते. त्यानंतर कैद्यांप्रमाणे भिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून स्थानिक न्यायालयात हजर केले जाते. या वेळी आठ, दहा दिवसांचे रिमांड दिले जाते. या कालावधीत भिकाऱ्यांची कौटुंबिक माहिती गोळा करून पर्यवेक्षकाकडून अहवाल तयार केला जातो. त्या अहवालाच्या आधारे भिकाऱ्याला मुक्त करायचे अथवा एक वर्षासाठी स्थान बद्ध करायचे हे ठरवले जाते. त्यानंतर त्यांची राज्यातील भिक्षेकरी गृहात रवानगी केली जाते. राज्यात चौदा ठिकाणी भिक्षेकरी गृह आहे....

फोटो - http://v.duta.us/L36eKQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/VcHzVAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬