[pune] - पुणेः डीएसकेची मालमत्ता ईडीकडून जप्त

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके ग्रुपची ९०४ कोटी रुपयांची स्थावर अंमलबजावणी संचालनालयाकडून ( ) जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये 'प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉँडरिंग अॅक्‍ट'नुसार जमीन, इमारती, सदनिका, एलआयसी पॉलिसी, रोख ठेव, बॅँक खात्यांचा समावेश आहे.

नियमित व्याज देण्याचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष व अन्य काही नातेवाइक तसेच कर्मचारी सध्या तुरुंगात आहेत. नियमित व्याजाचे आमिष दाखवून तब्बल ३५ हजार गुंतवणुकदारांची सुमारे ११३० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. डीएसके ग्रुपचे मुख्यालय पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर आहे. या ग्रुपच्या देशभरात रिअल इस्टेट, ऑटोमोबाइल, क्रीडा, माहिती तंत्रज्ञान तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध कंपन्या आहेत....

फोटो - http://v.duta.us/ppX18AAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9_DqhQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬