[pune] - पालिकेला पाणी बिलाचे ‘जड झाले ओझे’

  |   Punenews

जादा पाणीवापराच्या दरांमध्ये वाढ केल्याने त्याचा फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा विभागाकडून ग्रामपंचायंतीपासून महापालिकांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दरांत वाढ केल्याने राज्यभरातील पाण्याचे दर वाढले आहेत. त्याचा थेट फटका नागरिकांना बसणार असून, महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपट्टीत वाढ करण्याचे धोरण अवलंबविण्यास सुरुवात केली आहे. पुणे महापालिकेला दर वर्षी सरासरी ३० कोटी रुपये येणारी पाणीपट्टी ७५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घरगुती पाणीवापरासाठीच्या दरांत वाढ केली आहे. महापालिकेसाठी प्रती घनमीटरसाठी पाच पैशांत वाढ करून ती २५ पैसे केली आहे. पूर्वी हा दर २० पैसे इतका होता. दर वर्षी या दरात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी वापराच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने त्याचा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. महापालिकेचा मंजूर कोटा आणि पाणीवापर यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. शहराचा कोटा वाढण्यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने जलसंपदा विभागाने मोठ्या प्रमाणात थकबाकीची बिले काढण्यात येत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-dTaxQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬