[pune] - 'मुद्रा'चे ९० टक्के कर्ज थकीत

  |   Punenews

राजू मस्के

भंडारा :

होतकरू सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योजक बनण्याची संधी मिळावी, यासाठी पंधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मुद्रा योजनेचा उद्देश काही संधीसाधू व भामट्यांमुळे अयशस्वी झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. कर्ज घेतले, मात्र त्याचे हप्ते न भरलेल्यांची संख्या सुमारे ९० टक्के इतकी आहे. त्यामुळे बँकांसुद्धा अडचणीत सापडल्या असून नव्या उद्योजकांना कर्ज देण्यास कुचराई केली जात आहे. त्याचा फटका प्रामाणिक कर्ज घेणाऱ्या युवकांना बसत आहे.

केंद्र शासनाने घरगुती व्यवसाय, कुटीर उद्योग, शेतीवर आधारीत व्यवसाय व इतर लघू उद्योगांसाठी सन २०१५ पासून मुद्रा बँक योजना सुरू केली. या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरू, बेरोजगार यांना अर्थसहाय्य देण्यात येते. होतकरू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, हा या योजनेमागचा मूळ हेतू होता. केंद्र सरकारने ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश सर्वच बँकांना दिल्याने बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप केले. बँकेच्या धोरणानुसार दिलेल्या कर्जाचे हप्ते नियमितरित्या बँकेला येणे अपेक्षित आहे. परंतु, अनेकांनी कर्ज घेऊन एकही हप्ते भरले नसल्याचे चित्र बहुतांश बँकांमध्ये आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी कर्जधारकाला तगादासुद्धा लावता येत नसल्याने वसूली कशी करणार, असा पेच बँकांपुढे निर्माण झाला आहे. याशिवाय, कर्जाची वसुली थकल्याने संबंधित बँकांच्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने तेसुद्धा धास्तावले आहेत. त्यामुळे प्रामाणिक युवकांनाही कर्ज देताना बँकांकडून कसून चाचपणी केली जात आहे....

फोटो - http://v.duta.us/1VnhkwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/S4t1twAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬