[pune] - साखर विक्रीच्या दरात वाढ

  |   Punenews

कारखान्यांना ३१०० रु. प्रतिक्विंटल दराने साखर विकण्यास परवानगी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रास्त व किफायतशीर भावाची (एफआरपी) रक्कम मिळण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना २९०० ऐवजी ३१०० रुपये प्रतिक्विंटल दराने साखर विकण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांना 'एफआरपी' मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव सुरेश वसिष्ठ यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. त्यामध्ये कारखान्यांना ३१०० रुपये क्विंटल या दराने साखर विकण्याची परवानगी दिली आहे.

साखर विक्रीसाठी देशात २९०० रुपये किमान दर घोषित करण्यात आल्याने या दरापेक्षा कमी दरात कोणत्याही साखर कारखान्यांना साखर विक्री करता येत नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'एफआरपी' देण्यात साखर कारखान्यांपुढे अडचण निर्माण झाली होती. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने साखर विक्रीचा दर वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-PL12gAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬