[pune] - MPSC Exam: एमपीएससीत आशिष बारकुल प्रथम

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०१८ मध्ये घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, त्यात बार्शीचा (जि. सोलापूर) आशिष बारकुल राज्यातून पहिला क्रमांक येण्याचा बहुमान प्राप्त केला आह. सोलापूर जिल्ह्यातील महेश जमदाडे मागासवर्ग प्रवर्गातून; तर महिला प्रवर्गातून पुणे जिल्ह्यातून स्वाती दाभाडे या पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

एमपीएससीने गुरुवारी रात्री उशिरा निकाल जाहीर केला. एमपीएससीने १३६ पदांसाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा; तर त्यानंतर काही दिवसांनी मुलाखत घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेसाठी २३८१ उमेदवार पात्र ठरले होते. लेखी परीक्षेच्या आधारे एकूण ४२७ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. परीक्षेतून उत्तीर्ण होणारे उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, नायब तहसीलदार आदी वर्ग एकच्या पदासाठी पात्र ठरले आहे. आशिष बारकुल हा बार्शीचा रहिवासी असून, त्याने शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, पुणे (सीओईपी) येथून यंत्र अभियांत्रिकीमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. आशिषची आई शिक्षिका आहे; तर वडिल लिपीक म्हणून निवृत्त झाले आहेत. परीक्षेत सुमित शिंदे दुसऱ्या क्रमांकाने; तर पोपट ओमासे चौथ्या आणि सखाराम मुळे पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत....

फोटो - http://v.duta.us/K0G8nAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/B7rGMAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬