[thane] - ठाणेः पुनर्वसनासाठी तयार केलेले गाळे कोसळले

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी,

ठाण्यातील गांधीनगर परिसरात नाल्यालगत रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या कुटुंबांसाठी बांधण्यात आलेले गाळे गुरुवारी खचले. यामध्ये नऊ गाळ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. खासगी ठेकेदाराकडून हे काम करण्यात आले होते. या भागातील खुला नाला बंद करण्यासाठी महापालिकेने काम सुरू केले होते. त्याच दरम्यान हे गाळे कोसळल्यामुळे यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

ठाण्यातील रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक गाळे बाधित झाले असून या सर्व गाळेधाराकांना गांधीनगर परिसरामध्ये महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. खासगी ठेकेदाराच्या मदतीने या भागात ३० गाळे बांधण्यात आले होते. परंतु या गाळ्यांलगतच भला मोठा नाला असल्यामुळे येथे व्यवसाय करणे अडचणीचे होते. एक वर्षापासून हे गाळे पडून होते. काही दिवसांपूर्वी या गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन येथील गटार बंद करण्यासाठी विनंती केली होती. नाला बंदिस्त करण्याचे काम सुरू झाले असतानाच, गुरुवारी हे गाळे खचून खाली कोसळले. यामध्ये नऊ गाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा प्रकार घडल्याचा दावा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

फोटो - http://v.duta.us/eXEIBAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/xJ8Z8AAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬