[thane] - फसवणूक करणाऱ्या बिल्डरविरोधात गुन्हा

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

लाखो रुपये घेऊनही गाळे न देता भाजी विक्रेत्याची फसवणूक केल्याप्रकरणी मास बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या तिघांविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रेत्याची एकूण दहा लाखांची फसवणूक झाली आहे.

मास बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे मोहम्मद आझम अलाउद्दीन शेख, मोईद्दीन शेख आणि अकबर वाली मोहम्मद शेख यांनी कळव्यातील विटावा सूर्यनगरमध्ये चाळ पाडून त्याठिकाणी सात मजली नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेतले होते. याच इमारतीमधील गाळे विक्रीसाठी उपलब्ध होते. याबाबत सूर्यनगरमध्ये राहणारे भाजी विक्रेते सुधाकर जाधव यांनी दोन गाळे खरेदी करण्यासंदर्भात मोहम्मद आझम याची भेट घेतली. या दोन्ही गाळ्यांची एकूण किंमत २१ लाख ३० हजार रुपये होती. जाधव यांचा जांभळी नाका येथे भाजी विक्रीचा व्यवसाय असून व्यवसायासाठी ते आणि त्यांच्या भावाला गाळ्यांची आवश्यकता होती. गाळ्याच्या एकूण किमतीपैकी १० लाख रुपये जाधव यांनी बिल्डरला दिले होते. २०१० मध्ये करारही झाला होता. परंतु पैसे देऊनही त्यांना गाळा मिळाला नाही. त्यांनी बिल्डरकडे पैशाची मागणी केली असता बिल्डर टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी कळवा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1yvCMAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬