[thane] - बनावट आधारकार्ड; दुकलीला अटक

  |   Thanenews

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या लेटरहेडवर बनावट संमतीपत्र बनवून त्यांच्या खोट्या सही, शिक्क्यांचा वापर करून त्या आधारे बनावट आधारकार्ड तयार करून देत हजारो रुपये उकळणाऱ्या दोघांना डोंबिवली विष्णूनगर पोलिसांनी अटक केली. अशोक काठे व अनिल सिंदकर अशी आरोपींची नावे आहेत.

डोंबिवली पूर्वेकडील स्थानक परिसरातील रामनगर वाहतूक कार्यालयाच्या मागे तसेच डोंबिवली पश्चिमेकडे कोपर रोड शिवसेना शाखेजवळ असलेल्या सायबर कॅफेमध्ये बनावट आधारकार्ड बनवले जात असल्याची माहिती भाजप नगरसेवक राजन आभाळे यांना मिळाली होती. याबबत शहानिशा करण्यासाठी आभाळे यांनी वैभव गवस या तरुणाला या कॅफेमध्ये आधार कार्ड बनवण्याच्या बहाण्याने पाठवले असता कॅफेतील अशोक काठे व अनिल सिंदकर या दोघांनी वैभवला आधारकार्ड तयार करण्याचा हजार रुपये खर्च सांगितला. त्याने १ हजार रुपये देण्याचे मान्य करताच हे दोघे त्याला डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोड शिवसेना शाखेजवळील नेट फॉर यू सायबर कॅफेमध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या लेटरहेडवर समंतीपत्र तयार करत त्यावर वैभवचा फोटो लावून बनावट स्टँप मारला. राज्यमंत्र्याची खोटी सहीदेखील केली. हे पाहून वैभवने या दोघांना जाब विचारला. या प्रकरणी विष्णू नगर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अशोक काठे व अनिल सिंदकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो - http://v.duta.us/CxJoSgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/OszxtQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬