[thane] - ‘बुलेट’विरोध कायम

  |   Thanenews

सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडी आपल्या भूमिकेवर ठाम

म. टा. वृत्तसेवा, वसई

वसई-विरार शहर महापालिकेतील सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडीने प्रस्तावित 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पा'ला आपला विरोध कायम ठेवला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या पालिकेच्या महासभेत बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधी ठराव मंजूर करण्यात आला होता. महासभेचा हा ठराव राज्य सरकारने नुकताच निलंबित केला. मात्र पालिकेतील सत्ताधारी पक्ष आपल्या म्हणण्यावर कायम असून महासभेचा ठराव सरकारने विखंडित केल्यास पालिका याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा विचार करेल, असा इशारा सत्ताधारी पक्षाकडून बुधवारच्या महासभेत देण्यात आला.

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ही बुलेट ट्रेन वसई-विरार पालिका क्षेत्रातील १४ महसुली गावांतून जात असून गावातील बाधित क्षेत्र सुमारे ३० हेक्टर इतके आहे. लांबी १७ किमी आहे. मौजे विरार व मोरे या गावाच्या हद्दीवर बुलेट ट्रेन स्टेशन प्रस्तावित आहे. या बुलेट ट्रेन मार्गाचा वसई-विरार पालिकेच्या विकास आराखड्यात समावेश करावा व या रेल्वे प्रकल्पाने बाधित होणाऱ्या जागा मालकांना पालिकेकडून टीडीआर देण्याचा विषय १९ डिसेंबर २०१८ च्या महासभेत मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, हा पालिकेचा प्रकल्प नसल्याने टीडीआर देण्याचा प्रश्नच येत नाही, या प्रकल्पामुळे आदिवासी भूमिहीन होतील, असे सांगत बुलेट ट्रेनच्या विरोधात सत्ताधारी पक्षाकडून बहुमताने महासभेत ठराव मंजूर करण्यात आला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/LMjXDgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬