[thane] - भूमिका

  |   Thanenews

अधिकाऱ्यांवर कारवाई हवी

वाहन परवाना असो किंवा वाहनाची नोंदणी असो, टेबलाखालून पैसे दिल्याखेरीज काम होत नाही याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. अधिकारी थेट अर्थकारण करत नसून त्यासाठी आरटीओच्या परिसरात एजंट तैनात असतात. अर्जावर आपल्या मर्जीतल्या एजंटचा विशिष्ट शिक्का असल्याखेरीज अधिकारी त्यावर सही करत नाहीत, हेसुध्दा सर्वश्रुत आहे. हा सारा गैरव्यवहार रोखण्यासाठी माजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी या एजंटांना आरटीओ परिसरातून हद्दपार केले होते. मात्र, झगडे यांच्या बदली झाल्यानंतर हे दुष्टचक्र पुन्हा सुरू झाले आहे. लर्निंग लायसन्स काढून देण्यासाठी लाच स्वीकारताना ठाण्यातील पाच एजंटांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. त्यानंतर आरटीओत सक्रिय असलेले सर्व एजंट भूमिगत झाले आहेत. मात्र, ही चौकशी त्या एजंटांपुरतीच मर्यादीत न ठेवता ते कोणत्या अधिकाऱ्यांसाठी पैसे गोळा करत होते, याचा शोधही पोलिसांनी घ्यायला हवा. त्या अधिकाऱ्यांचीसुध्दा चौकशी व्हायला हवी. तसेच, या कारवाईनंतर पालिकेने आरटीओ परिसरातील एजंटांचे बेकायदा गाळे जमीनदोस्त केले आहेत. ते पुन्हा उभे राहणार नाहीत, याची खबरदारीसुध्दा पालिकेने घ्यायला हवी. अन्यथा आजवरच्या परंपरेनुसार काही दिवसांत आरटीओमधील काळाबाजार पुन्हा राजरोसपणे सुरू होईल.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/m8LOKQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬