[thane] - मोबाइलवरून चाकूहल्ला

  |   Thanenews

कल्याण : पब्जी खेळत असताना पहाटेच्या सुमारास मोबाइलची बॅटरी उतरल्यामुळे संतापलेल्या तरुणाने वाद घालत चक्क होणाऱ्या मेहुण्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना कल्याण पूर्व येथे घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

अंबरनाथ येथे राहणारे ओम बावदनकर यांचे कल्याण पूर्व काटेमानवली पावशे नगर जयमोती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तरुणीशी लग्न जमले होते. गेल्या गुरुवारी ओम होणाऱ्या पत्नीच्या घरी गेला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ओमच्या होणाऱ्या पत्नीचा भाऊ रजनीश राजभर हा मोबाइलवर पब्जी गेम खेळत होता. त्यावेळी मोबाइलची बॅटरी उतरल्याने त्याने मोबाइल चार्जिंगला लावला. मात्र चार्जरची वायर कुत्र्याने चावल्याने तो चार्ज होत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या रजनीशने चाकूने बहिणीच्या लॅपटॉपची वायर कापली. यामुळे घरात वाद झाला. ओमही रजनीशला रागाने बोलला. आधीच गेम अर्धवट राहिल्याने संतापलेल्या रजनीशचा रागाचा पारा चढला. त्याने वायर कापलेल्या चाकूने थेट ओम यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ओम यांना गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/VLTXJgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬