[thane] - महिला शौचालय दरवाजाविना

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र सरकार शौचालयांच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी ‘दरवाजा बंद’ ही जाहिरात करत असताना, अंबरनाथ नगरपालिकेने चार कोटी रुपये खर्च करत शहरात उभारलेल्या शौचालयांपैकी कोसगाव येथील महिलांच्या शौचालयांना दरवाजाच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील महिलांना प्लायवूडचा आधार घेत शौचालयाचा वापर करावा लागत आहे. अंबरनाथ नगरपालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी अंबरनाथ नगरपालिका शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे. तसेच शहरातील शौचालयांच्या दुरुस्तीसाठी अंबरनाथ नगरपालिकेने गेल्या दोन वर्षांत जवळपास चार कोटी रुपयांचा निधी खर्च केला. नगरपालिका कंत्राटदारांवर अवलंबून राहत ही कामे करत असली तरी प्रत्यक्षात मात्र शहरातील शौचालयांची परिस्थिती गंभीर असल्याची बाब समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील कोहोजगाव भागात महिलांसाठी शौचालय बांधण्यात आले आहे. मात्र सहा महिन्यांपासून या शौचालयांना दरवाजे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शौचालयाचा वापर करताना महिलांना येथे ठेवलेल्या प्लायवूडचा आधार घेत शौचालय वापरण्याची नामुष्की ओढावली आहे....

फोटो - http://v.duta.us/ryJtTgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KuuHKwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬