[thane] - राष्ट्रवादीत दिलजमाई

  |   Thanenews

राष्ट्रवादीत दिलजमाई

आ. आव्हाड आणि नजीब मुल्ला पुन्हा एकत्र

म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली दुही मिटविण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अखेर यश आले आहे. दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पवार यांनी त्यांच्यात समझोता घडवून आणला आहे. त्यामुळे एकमेकांपासून दुरावलेले आ. जीतेंद्र आव्हाड आणि नगरसेवक नजीब मुल्ला या गुरूशिष्यात दिलजमाई झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षहितासाठी आवश्यक ते सारे प्रयत्न करण्याचा निर्धार दोन्ही गटातल्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे वृत्त आहे.

पक्षांतर्गत निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नाही. केवळ कळवा मुंब्र्यातील विकासकामांवर लक्ष केंद्रीत करून उर्वरीत शहराकडे दुर्लक्ष होत असल्याचे आक्षेप नोंदवर राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांनी आपली नाराजी वारंवार व्यक्त केली होती. हा वाद विकोपाला गेल्यानंतर नजीब मुल्ला यांनी आपल्या स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामासुध्दा दिला होता. शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील या आव्हाड समर्थक पदाधिकाऱ्यांसोबतही त्यांचे वितुष्ट निर्माण झाले होते. या वादंगानंतर नजीब मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील, शिवसेनेच्या पाठिंब्यावर कळवा मुंब्र्यातून निवडणूक लढवतील किंवा काँग्रेसच्या तिकिटावर भिवंडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशा अनेक अफवा पेरण्यात आल्या होत्या. परंतु, हे वादळ चहाच्या पेल्यातलेच ठरले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/L1Y4kgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬