[thane] - सिटीझन अॅपचाही लवकरच शुभारंभ

  |   Thanenews

शहरातील वाहतूक बदलाच्या माहितीसह ते नियम तोडल्यास किती दंड भरावा लागेल याबाबतची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी लवकरच वाहतूक विभागातर्फे सिटीझन अॅप सुरू करण्यात येणार आहे. ठाण्यातील तीन हात नाका येथील वाहतूक शाखेच्या उपायुक्त कार्यालयात ई-चलानचा शुभारंभ केल्यानंतर ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ही माहिती दिली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास यापुढे पावतीऐवजी ई-चलानद्वारे दंड वसुली होणार असून ठाणे पोलिस आयुक्तालयाबरोबर मुंबई, नवी मुंबई, नागपूर येथेही ई चलानची सुरुवात झालेली आहे. ई चलानच्या उद्घाटनानंतर पोलिस आयुक्त फणसळकर म्हणाले, 'मुंबईनंतर ठाण्यात ई-चलान सुरू होत आहे. मात्र दंड वसूल करणे हे वाहतूक पोलिसांचे उद्दिष्ट नाही. नागरिकांनीदेखील वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.' ई-चलानमुळे कामकाजात पारदर्शकता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला....

फोटो - http://v.duta.us/uQq9WQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/r3IWSwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬