[ahmednagar] - अशोक विखेंच्या चर्चेने दोन्हीकडे अस्वस्थता

  |   Ahmednagarnews

लोकसभा उमेदवारीची रंगत वाढती; युतीमधील वातावरण थंड

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या शर्यतीत अचानकपणे जिल्ह्यातील प्रसिद्ध विखे परिवारातील सदस्य डॉ. अशोक विखे यांचे नाव आल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, राज्यस्तरावर भाजप-शिवसेना युतीचे भिजत घोंगडे कायम असल्याने स्थानिक स्तरावर या दोन्ही पक्षांच्या राजकीय हालचालींमध्ये सध्या थंडावा आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. सुजय विखे लढण्यास इच्छुक आहेत. मागील दीड-दोन वर्षांपासून त्यांनी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून तयारीही सुरू केली आहे. दक्षिण नगर जिल्ह्यातील प्रमुख गावे व तालुका गावांतून मोफत आरोग्य शिबिरे घेताना यानिमित्ताने जनसंपर्क वाढवला आहे तसेच स्थानिक राजकारणातील दिग्गज तसेच युवा पिढीला समवेत घेण्याचे धोरण अवलंबले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे सख्खे काका व दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. अशोक विखे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या शर्यतीत असल्याच्या चर्चेने दक्षिणेतील डॉ. विखे विरुद्ध डॉ. विखे ही काका-पुतण्याची संभाव्य लढत नेमकी कोणाला त्रासदायक ठरेल, या विचारामु‌ळे दक्षिणेतील काँग्रेस व राष्ट्रवादी समर्थक अस्वस्थ झाले आहेत. विखे परिवाराअंतर्गत असलेल्या कौटुंबिक वादाची किनारही या चर्चेला असल्याने त्यावरूनही विखे समर्थकांत अस्वस्थता आहे....

फोटो - http://v.duta.us/0bv4CQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/D7uaXQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬