[ahmednagar] - कचरा वेचकांनी गिरवले प्रशिक्षणाचे धडे

  |   Ahmednagarnews

स्वआरोग्य राखण्याबाबत तज्ज्ञांकडून टिप्स

म. टा. प्रतिनिधी, नगर

पाठीला मोठी पिशवी लावून दिवसभर शहरातील कचरा कुंड्यांसह विविध ठिकाणी पडलेला कचरा धुंडाळताना त्यातून कागद, काच, पत्रा व अन्य विकले जाणारे साहित्य गोळा करणाऱ्या ५० वर कचरा वेचक महिलांनी हे काम करताना स्वतःचे आरोग्य कसे राखावे, याबाबतच्या टिप्स नुकत्याच तज्ज्ञांकडून घेतल्या. कागद, काच, पत्रा वेचक कष्टकरी पंचायतीने पुण्यातील कैम-शाला संस्थेच्या मदतीने या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

कचरा वेचताना स्वआरोग्याची काळजी घेण्यासाठीचे प्रबोधनात्मक प्रशिक्षण रामवाडी, भारस्कर कॉलनी, सिद्धार्थनगर आदी भागातील कचरा वेचण्याचे काम करून त्याद्वारे उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना देण्यात आले. रामवाडीच्या बालभवनात झालेल्या या प्रशिक्षणात कचरा वेचकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षा कीट देण्यात आले. या कीटमधील मास्क, ग्लोज, जॅकेट, टोपी यांचा वापर कसा करावा व स्वतःचे आरोग्य कसे जपावे याबाबत पुण्याचे शिवराज जाधव यांनी मार्गदर्शन केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे व सुनील पवार, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. पैठणकर तसेच कागद, काच, पत्रा वेचक कष्टकरी पंचायतीचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब उडाणशिवे, विकास उडाणशिवे आदी उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/4SQOuQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/6kOkNgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬