[ahmednagar] - कष्टकरी महिलांची उद्या मोफत आरोग्य तपासणी

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

सार्वजनिक स्वच्छतेसह विडी उद्योग व अन्य विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकरी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय उपचार तसेच यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाच्या तज्ज्ञांद्वारे मोफत दंत आरोग्य तपासणी आणि जनकल्याण रक्तपेढीद्वारे रक्तगट तपासणी शिबिर शनिवारी (९ फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता सावेडीच्या पाइपलाइन रोडवरील मोरया मंगल कार्यालयात होणार आहे.

येथील आर्किटेक्ट, इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन, क्रेडाई नगर शाखा आणि अनुलोम संस्थेच्या पुढाकाराने सुधाताई मुळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. समाजातील गरजू व कष्टकरी महिलांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी दरवर्षी या शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाच्या या शिबिराचे नियोजन 'क्रेडाई'चे नगरचे अध्यक्ष संजय गुगळे, 'आर्किटेक्ट'चे अध्यक्ष अशोक सातकर व 'अनुलोम'चे नगरचे प्रमुख राजेश्वर श्रीराम यांच्यासह रवींद्र मुळे, मनीषा मुळे, उदय भणगे, डॉ. मनोहर देशपांडे, प्रशांत आढाव, अंकुश गोळे आदी सदस्यांनी केले आहे....

फोटो - http://v.duta.us/HRA5NAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hREMeQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬