[ahmednagar] - नव्या कचरा रॅम्पसाठी पर्यायी जागेचा शोध
आमदार संग्राम जगताप यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, नगर
नालेगावातील वारुळाचा मारुती परिसरात महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या नव्या कचरा रॅम्पच्या विरोधात शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापही मैदानात उतरले आहेत. वारुळाचा मारुती परिसरात कचरा रॅम्प होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी नालेगावातील ग्रामस्थांशी बोलताना मांडली आहे.
नालेगावातील वारुळाचा मारुती ते निंबळक या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे नालेगाव ग्रामस्थांनी आमदार जगताप यांचा सत्कार केला. या वेळी त्यांच्याशी बोलताना वारुळाचा मारुती परिसरात कचरा रॅम्प होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कचरा रॅम्पसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. शहरातील व उपनगरातील नागरिकांना त्रास होणार नाही, अशा ठिकाणी हा कचरा रॅम्प केला जाईल, असेही ते म्हणाले....
फोटो - http://v.duta.us/DjgARwAA
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-PkCMwAA