[ahmednagar] - राठोंडाचा हद्दपारीचा प्रस्ताव नगर प्रातांकडे

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हद्दपारीसाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालासह पुन्हा नगर प्रांत उज्ज्वला गाडेकर यांच्या कार्यालयास मिळाला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने खुलासा करण्यासाठी राठोड यांना प्रांत कार्यालयाकडून नोटीस पाठविण्यात येणार असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रस्तावावर उपविभागीय दंडाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार असून त्यानंतर अंतिम आदेश काढला जाणार आहे.

जिल्हा पोलिस प्रशासनाने नगर प्रांत तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून हा प्रस्ताव शहर विभागाचे पोलिस उपअधिक्षक कार्यालयाकडे पंधरा दिवसापूर्वी पाठविण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून चौकशी झाल्यानंतर पुन्हा एकदा हा प्रस्ताव पोलिस विभागाच्या टिप्पणीसह उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयास मिळाला आहे. आता उपविभागीय दंडाधिकारी या प्रस्तावाच्या अनुषंगाने खुलासा करण्याची व आपले म्हणणे सादर करण्याची नोटीस राठोड यांना बजावणार आहेत. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीचे काम पूर्ण झाल्यानंतर राठोड यांच्या हद्दीपारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Qhj2WwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬