[ahmednagar] - शेती महामंडळ कामगारआंदोलनाच्या तयारीत

  |   Ahmednagarnews

येत्या २८ ला नियोजन; विविध प्रश्न सोडवण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नगर

निवृत्त व रोजंदार कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा द्यावी; तसेच पंतप्रधान योजनेतून त्यांना घरे बांधून देण्यासह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेती महामंडळाच्या राज्यातील कामगारांचे धरणे आंदोलन येत्या २८ रोजी मुंबईत होणार आहे. प्रलंबित मागण्यांबाबत गेल्या तीन वर्षांत पत्रव्यवहार करूनही महामंडळ व राज्य सरकारने कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समिती अध्यक्ष आनंद वायकर, उपाध्यक्ष अविनाश आपटे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील धरणे आंदोलनाचे नियोजन केले आहे. येत्या २८ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे. शेती महामंडळ कामगारांच्या मागण्यांबाबत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व औद्योगिक न्यायालयांनी दिलेले निर्णय, तसेच महसूलमंत्री व महसूल राज्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक बोलावून निर्णय घेतला नाही, तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे....

फोटो - http://v.duta.us/E1OKUAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KCY8pwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬