[beed] - चुलते-पुतण्याचा गाळाखाली दाबून मृत्यू

  |   Beednews

म. टा. प्रतिनिधी, बीड

शेतात गाळ टाकण्याचे काम सुरू असताना काका-पुतणे गाळाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने मरण पावले. ही घटना केज तालुक्यातील भाटुंबा येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी टिप्पर चालकाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्जेराव बबन धपाटे व बंटी हरिदास धपाटे असे मृत चुलत्या-पुतण्याची नावे आहेत. भाटुंबा येथील सर्जेराव धपाटे यांच्या शेतामध्ये तळ्यातील गाळ टाकला जात होता. टिप्परद्वारे (क्रमांक एम.एच.४२ टी ०८७०) तळ्यातून माती आणण्याचे काम सुरू होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमरास टिप्पर गाळ आणण्यासाठी गेले होते. टिप्पर गाळ भरून येईपर्यंत सर्जेराव धपाटे व त्यांचा पुतण्या बंटी हरिदास धपाटे हे दोघेजण शेतातच झोपी गेले. टिप्पर चालक गाळ घेवून आल्यानंतर त्याने काका-पुतणे कुठे आहेत. हे न पाहताच टिप्परमधील गाळ ज्याठिकाणी काका आणि पुतण्या झोपले होते त्यांच्या अंगावर ओतून रिकामे केले. गुरुवारी सकाळी सर्जेराव धपाटे आणि बंटी धपाटे घरी आले नाहीत. शेतात पाहणी केली असता ते आढळून न असल्याने माती खाली गाडले गेले असावेत असा कयास गावकऱ्यांनी काढला. जेसीबीद्वारे मातीचे ढिगारा बाजुला केला असता गाळाच्या खाली त्या दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती युसूफ वडगाव पोलिसांनी झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

फोटो - http://v.duta.us/BZfU0QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GyDl3AAA

📲 Get Beed News on Whatsapp 💬