[kolhapur] - उषा नाईक यांना नृत्यकर्मी पुरस्कार

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठी सिनेसृष्टीत गेली अनेक वर्षे काम करत आहे. विविध प्रकारच्या भूमिका केल्या. नृत्यांगणापासून सुरू झालेला प्रवास मुख्य अभिनेत्री, चरित्र अभिनेत्रीपर्यत पोहचला. आज वयाची ६२ वर्षे पूर्ण झाली आहेत. कलाप्रवासाच्या या वळणावर कोल्हापुरातील नृत्य क्षेत्रातील युवा कलाकारांनी 'नृत्यकर्मी' पुरस्काराने माझा सन्मान केला. नातवांना आजीचे आणि आजीचे नातवांना फार कौतुक असते. माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. कोल्हापुरातील हा सत्कार म्हणजे नातवांकडून आजीचे कौतुक करण्यासारखे आहे. हा सन्मान सोहळा कायम स्मरणात राहील,'असे उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी काढले.

कोल्हापूर डान्स असोसिएशन या संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह रणजित जाधव अध्यक्षस्थानी होते. अभिनेता देवेंद्र चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. असोसिएशनतर्फे अभिनेत्री उषा नाईक यांना यंदाचा 'नृत्यकर्मी' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. उद्यमनगर येथील कृष्णा सांस्कृतिक सभागृह येथे कार्यक्रम झाला....

फोटो - http://v.duta.us/Jgyb4AAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2i7JVgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬