[kolhapur] - रंगणार गल्लीचे गेट टुगेदार

  |   Kolhapurnews

कोल्हापूर टाइम्स टीम

गेली १२० वर्षे धान्य अडत दुकानांची परपंरा असलेले नष्ट्यांचं घर. शेजारी नासिपुडे, अथणे, पोहेवाले भिवटे, तोडकर महाराज यांची आड्याला आडं असणारी घरं. याच गल्लीत 'लाइफबॉय'चे माणगावे, सुगंधी अत्तरवाले, कटके, स्वामी यांच्या घराबरोबर सांगावकरांचे केश कर्तनालय, तुकाराम टेलर, किराणावाले डोंगरकर, मेणबत्तीवाले तांबोळी अशी विविध जाती धर्मांची कुटुंबे शनिवार पेठेतील नष्टे गल्लीत एकत्र नांदतात. व्यवसायात गुंतलेल्या नव्या-जुन्या पिढीतील लोकांना एकत्र आणण्यासाठी तरुणांनी 'व्हॅलेंटाइन डे'च्या पूर्वसंध्येला 'गल्लीचे गेट-टुगेदर' आयोजित केले आहे. या उपक्रमातून गल्लीतील नात्यांची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न आहे.

व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून गप्पा माराव्यात, ज्येष्ठांबद्दल आदर व्यक्त करावा यासाठी गल्लीतील युवकांनी बुधवारी (ता. १३ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता बसंत बहार रोडवरील नष्टे मंगल कार्यालयात गेट टुगेदरचे आयोजन केले आहे. गल्लीतील दिवंगत व्यक्तींना आदराजंली वाहण्यात येईल. ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात येणार आहे. अनेक लहानथोर मंडळी अनुभवकथन करतील. गप्पागोष्टींबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uUwEEwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬