[kolhapur] - वेतनासाठी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील जवळपास ६०० हून अधिक संगणक परिचालकांनी थकीत पगार, चालू पगार व अन्य कामांच्या मोबदल्यासाठी गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही वेतन न झाल्यामुळे संतप्त बनलेल्या परिचालकांनी ठेकेदार कंपनी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणेबाजी केली. काही कर्मचाऱ्यांनी रॉकेलच्या बाटल्या सोबत आणल्या होत्या. वेतनासंदर्भात ठोस निर्णयास विलंब लागत असल्यामुळे आंदोलक सामूहिक आत्मदहन करण्याच्या पावित्र्यात उतरल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. सायंकाळी पाचच्या सुमारास प्रशासनाने सात दिवसात पगार करण्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याचे संघटनेने म्हटले आहे.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस फौजफाटा, अग्निशमन दलाची गाडी दिवसभर जि.प.परिसरात तैनात होती. परिचालकांनी तीन तासांहून अधिक काळ जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर ठिय्या मारला. कोल्हापूर जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात जिल्ह्यातील ८०० पैकी ६९७ संगणक परिचालकांनी सहभाग झाला. हे कर्मचारी सीएएस, एसपीव्ही या कंपनीकडे काम करतात. ग्रामपंचायतीकडून या कर्मचाऱ्यांचा पगार जिल्हा परिषदेकडे जमा होतो आणि जि.प.मार्फत संबंधित कंपनीच्या खात्यावर रक्कम जमा होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना वेतन उपलब्ध होते. त्यांच्यापैकी काहीजण वर्षभरापासून तर काहीजण सहा महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. सगळ्या कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल दीड कोटी रुपये वेतनाची रक्कम थकीत आहे....

फोटो - http://v.duta.us/Q5pugAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5slhiAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬