[kolhapur] - bank robbery: यशवंत सहकारी बँकेच्या शाखेवर १ कोटीचा दरोडा

  |   Kolhapurnews

म .टा . वृत्तसेवा, कोल्हापूर/गगनबावडा

यशवंत सहकारी बँकेच्या शाखेवर रात्री चोरट्यांनी दरोडा टाकला. यात सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून बँक लुटली. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघड झाली. पान्हाळा तालुक्यातील कळे गावातल्या शाखेत हा दरोडा पडला. एवढया मोठया प्रमाणात पडलेल्या दरोडयाने कळे परिसर हदरला आहे.

कळे येथे बाजार भोगाव मार्गावर यशवंत सहकारी बँकेची शाखा मुख्य बाजारपेठेत आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी बँकेच्या इमारतीच्या उजव्या बाजूच्या खिडकीचे ग्रील गॅस कटरच्या साहाय्याने तोडून बँकेत प्रवेश केला. त्यांनी प्रथम सी.सी.टी.व्ही. आणि संगणकीय यंत्रणेची वायर कापून ते बंद केले. त्यानंतर त्यांनी लॉकरच्या सभोवतीची जाळी कापून बँकेच्या ताब्यातील सोन्याच्या दागिन्यांची कलमे ताब्यात घेतली. तिजोरीचे लॉक कापून त्यातील ८ लाख ५७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. यानंतर घटनास्थळी कळे पोलीस दाखल झाले आहेत. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. ठसेतज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

फोटो - http://v.duta.us/-9l80gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/e46gMwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬