[maharashtra] - पुणतांबा अन्नत्याग आंदोलन : रुग्णालयातही मुलींनी अन्न नाकारलं

  |   Maharashtranews

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या तिन्ही मुलींची प्रकृती खालावलीय. शुभांगी जाधव नावाच्या मुलीची प्रकृती अधिकच खालावल्यानं रात्री प्रशासनानं तिला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हलवलंय. परंतु, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशी मागणी घेऊन उपोषणाला बसलेल्या या मुलीने रुग्णालयातही अन्न नाकारले आहे. सलाईनवरच उपचार घेऊन थोडं बरं वाटल्यावर पुन्हा उपोषण स्थळी दाखल होणार असल्याचा निर्धार तिनं व्यक्त केलाय.

उल्लेखनीय म्हणजे, शेतकरी कन्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दीड वर्षापूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ तसंच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 'किसान क्रांती' या संघटनेच्यावतीनं पुणतांबा येथे शुभांगी जाधव, पूनम जाधव, निकिता जाधव या उच्चशिक्षित शेतकरी कन्यांनी अन्नत्याग करून सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे....

फोटो - http://v.duta.us/BZEtygAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/S7jf6QAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬