[maharashtra] - 'मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करणार'

  |   Maharashtranews

नितेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस २८ तारखेला विधानसभा बरखास्त करतील आणि राजीनामा देतील, त्यामुळे राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होतील, असा भाकीत वजा अंदाज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय. गुरुवारी औरंगाबामधील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांसोबत जागा वाटपाची बोलणी सुरु असून, मतांचं विभाजन होऊन भाजपाला फायदा होईल असं कोणतही काम करू नका, असा सल्लादेखील त्यांनी सहकारी पक्षांना आणि कार्यकर्त्यांना यावेळी दिलाय.

भाजप नेते भक्षक असून यांच्यापासून लोकांच्या पोरीबाळी काय सुरक्षित राहणार, असं म्हणत 'भाजपवालोंसे बेटी बचाव म्हणण्याची वेळ आल्याची' टीका अशोक चव्हाण यांनी केली. गल्ली-बोळातले चौकीदार देशाच्या चौकीदारामुळे बदनाम झालेत... पण हे गल्लीबोळातले चौकीदार चोर नाही तर देशाचा चौकीदारच चोर आहे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. लोकशाहीत विरोधकांना कुत्र्या-मांजराची उपमा दिली जात असेल तर हीच कुत्रे-मांजर तुमच्या गळ्याचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय....

फोटो - http://v.duta.us/0berOAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/e4IEQAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬