[maharashtra] - विजयमला पटेकर अवैध गर्भपात आणि मृत्यू प्रकरण : मुंडे दाम्पत्याचा आज निकाल

  |   Maharashtranews

लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : परळी येथील भ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी सरस्वती मुंडे यांचा आज बीड जिल्हा न्यायालयात निकाल लागणार आहे. परळी येथील मुंडे हॉस्पिटलमध्ये मे २०१२ साली विजयमला पटेकर या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंडे हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरण समोर आले होते.

याआधी, २०१० सालीही लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख ऍड वर्षा देशपांडे यांनी स्टिंग ऑपरेशन करून मुंडे दाम्पत्याच्या रुग्णालयात अवैध गर्भलिंग चाचणी आणि अवैध गर्भपात होत असल्याचं जगासमोर आणलं होतं. यानंतर महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंडे हॉस्पिटलची तपासणी केली. त्यावेळी गर्भलिंग निदान चाचणीचे रेकॉर्ड अध्यायावत ठेवले नसल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी वेगवेगळ्या कलमांखाली आठ गुन्हे मुंडे दाम्पत्यावर दाखल करण्यात आले होते....

फोटो - http://v.duta.us/7ZaSeAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Y3ZnxAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬