[mumbai] - ...आणि शेवाळेंमुळे खुशीची 'ती' फाइल परत मिळाली.

  |   Mumbainews

मुंबई:

लोकल निघून गेल्यावर तब्बल १०,००० रुपये आणि कॅन्सरची फाइल ट्रेनमध्येच राहिल्याचं लक्षात आलं तेव्हा त्या मायलेकींच्या डोक्यावर आभाळ कोसळलं. पण स्टेशन मास्टर विनायक शेवाळे यांच्या धडपडीमुळे खुशी आणि साधना सोनार यांन त्यांची फाइल अवघ्या दीड तासात परत मिळाली आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. विनायक शेवाळेंनी तत्परतेने अडचणीतील प्रवाशांची मदत केल्यामुळे त्यांची प्रशंसा केली जाते आहे.

नवी मुंबईत राहणाऱ्या खुशी सोनार या मुलीला पोटाचा कॅन्सर झाला होता. मागच्यावर्षी टाटा मेमोरिअल रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण त्यानंतर दर महिन्यात वैद्यकीय तपासणीसाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयाला भेट द्यावी लागते.

त्यासाठीच गुरुवारी सकाळी साडे नऊ पावणे दहाच्या सुमारास १३ वर्षांची खुशी तिच्या आईसोबत टाटा मेमोरिअल रुग्णालयात गेली होती. रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर दोघीही मायलेकी लोकलने सेवरीला परतल्या. पण सेवरी स्थानकावर उतरल्यानंतर खुशीच्या कॅन्सरची माहिती असलेली फाइल आणि १०,००० रुपये लोकलमध्येच राहिल्याची बाब दोघी मायलेकींना लक्षात आली. तोपर्यंच लोकल सेवरी स्टेशन सोडून निघून गेली होती. खुशीची अत्यंत महत्त्वाची फाइल ट्रेनमध्ये राहिल्यामुळे तिचं भरपूर नुकसान होईल अशी भीती साधना सोनार यांना वाटत होती. यामुळेच त्यांनी स्टेशन मास्तर कचेरीकडे धाव घेतली. घडलेल्या सगळ्या प्रकरणाची माहिती साधना सोनार यांनी स्टेशन मास्तर विनायक शेवाळेंना दिली....

फोटो - http://v.duta.us/7tz4-gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/AsGITQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬