[mumbai] - एसटी महामंडळात ८,०२२ चालक-वाहक पदांची भरती

  |   Mumbainews

मुंबई: एसटी महामंडळामार्फत सध्या चालक-वाहकांच्या ८०२२ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीमध्ये हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

एसटी महामंडळामार्फत राज्यात सध्या ८ हजार २२ इतक्या चालक आणि वाहक पदांची भरती सुरु आहे. यापैकी दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४१६ तर उर्वरीत जिल्ह्यांमध्ये ३ हजार ६०६ इतकी पदे भरली जाणार आहेत. दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या नियोजनानुसार अर्ज करण्याची मुदत आज दि. ८ फेब्रुवारी रोजी संपणार होती. इतर जिल्ह्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी संबंधीत जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परिक्षा होणार आहे....

फोटो - http://v.duta.us/cWz1OwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PxaDmgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬