[mumbai] - एसटी शिवशाही स्लिपर बसच्या तिकीट दरात कपात

  |   Mumbainews

मुंबई: एस.टी महामंडळ वातानुकूलित शिवशाही शयनयान (स्लीपर) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही दर कपात करण्यात आली असून नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आली आहे.

राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दरकपात करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

एस.टी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. एस.टी महामंडळातर्फे राज्यातील विविध ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर शयनयान बस सुरु होण्याची शक्यता आहे. वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना, तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे, त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार आहे. प्रवाशांनी सुरक्षित आरामदायी व किफायतशीर शयनयान प्रवासासाठी एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा वापर करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

फोटो - http://v.duta.us/3AIZZgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UTlb6QAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬