[mumbai] - पालिका ऑनलाइन!

  |   Mumbainews

माहिती तंत्रज्ञान आधारित सेवांवर भर देण्याचा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेने प्रशासकीय कामकाजात सुधारणा, कार्यपद्धतीन सुसूत्रतात, महसूल संकलन वाढीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित सेवांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या विस्तार प्रचंड असून त्यातील वेगवेगळ्या विभागांमधील माहितीची आदान-प्रदान सोपी होण्यासाठीही या यंत्रणेचा वापर होणार आहे. पालिकेच्या अखत्यारीतील कर्मचारी व्यवस्थापन, मुंबईकरांना घरबसल्या आणखी काही सुविधा उपलब्ध करण्याचेही नियोजन आहे. या गोष्टी साध्य करण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे अर्थसंकल्पात ३७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मुंबई पालिकेकडून वेगवेगळ्या ६० सेवा ऑनलाइन पुरवल्या जात असून पुढील वर्षापर्यंत त्यात आणखी ५३ सेवांचा समावेश केला जाणार आहे. त्यात, कारखाने परवाने, छायाचित्रण परवानगी, व्यवसायसंदर्भातील परवाने आदींचा समावेश राहणार आहे. पालिकेत आयटी आधारित सेवा सुविधा, प्रशासकीय प्रक्रियांसाठी 'सॅप' या ईआरपी प्रणालीचा वापर होतो. या वर्षात सॅप हाना ही सुधारित आवृत्ती उपयोगात आणण्याचा मानस आहे. जगभरात रूढ झालेल्या क्लाऊड पद्धतीच्या आधारे कम्प्युटरमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. 'इज ऑफ डुइंग बिझिनेस' अंतर्गत ऑटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्जन्यजल वाहिन्या, मलनि:सारण प्रकल्प आदी विभागातील माहितीचे आदान-प्रदान सुलभ होईल....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/o6NnRAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬