[mumbai] - मध्य रेल्वेला फाटकमुक्तीची प्रतीक्षा

  |   Mumbainews

येथील फाटकांचा प्रश्न...

१. मुंब्रा-कळवा

२. दिवा-मुंब्रा

३. शहाड-आंबिवली

४. टिटवाळा-आंबिवली

५. चुनाभट्टी-कुर्ला

Tweet : mchemteMT

मुंबई : अपघात, लोकल-मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या खोळंब्यासाठी कारणीभूत ठरणारे रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याबाबत रेल्वे प्रशासन अनेक वर्षांपासून विविध महापालिकांशी पत्रव्यवहार करीत आहे. मात्र रेल्वेच्या पत्रांबाबत संबंधित महापालिका गंभीर नसल्यामुळे उपनगरी रेल्वे अद्याप फाटकमुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील ४५ लाख प्रवाशांना रोजच लोकलगोंधळाचा त्रास सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेवरील उपनगरीय मार्गावर दिवा-मुंब्रा, टिटवाळा-आंबिवली, शहाड-आंबिवली, ठाकुर्ली-डोंबिवली, मुंब्रा-कळवा दरम्यान रेल्वे फाटक आहेत. दिवा स्थानकातील फाटक दिवसभरात किमान ५० वेळा उघडबंद केले जाते. कळवा खारीगाव फाटक ८० वेळा तर शहाड-आंबिवलीदरम्यानचे फाटक ३५ वेळा उघडबंद होते. ठाकुर्ली स्थानकात रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) उभारण्यात आल्यामुळे फाटक बंद झाले. अन्य स्थानकांदरम्यान मात्र आरओबी नसल्यामुळे फाटक सुरूच असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BtuiMAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬