[mumbai] - ‘मापात पाप’ला चाप

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मापात पाप करणाऱ्या आणि एमआरपीपेक्षा अधिक पैसे उकळणाऱ्या आस्थापनांवर वैधमापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत या विभागाने राज्यात ७५५३ आस्थापनांवर कारवाई केली असून यामध्ये किरकोळ विक्रेत्यापासून बड्या व्यापाऱ्यांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पॅकबंद वस्तूंवरील एमआरपीपेक्षा अधिक किंमत घेतली जाते तसेच वजन काट्यामध्ये छेडछाड करून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वैधमापन शास्त्र विभागाकडे येत असतात. त्याचप्रमाणे या विभागाचे निरीक्षकही नियमित आस्थापनांमध्ये जाऊन तपासणी करतात. एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत वैधमापन शास्त्र विभागाने कमी वजन देऊन फसवणूक करणाऱ्या ४२९३ जणांवर कारवाई केली. तर पॅकबंद वस्तूंवर जास्त दर आकारणाऱ्या ३२६० आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्त्यावर किरकोळ सामानाची विक्री करणााऱ्यांबरोबरच बड्या मॉलमधील आस्थापनांचा समावेश असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या कारवाईतून आतापर्यंत पाच कोटी ९० लाख ७५ हजार इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. पॅकबंद वस्तूवर कारवाई करताना एमआरपी बरोबरच उत्पादन निर्मितीच्या तारखेत छेडछाड करणे, कंपनीचा पत्ता न छापणे, उत्पादनामध्ये वापर करण्यात आलेल्या पदार्थाची माहिती न छापणे अशा नियमांचा भंग करण्यात आला असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले....

फोटो - http://v.duta.us/sZcysgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NGOINAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬