[mumbai] - १२५ अतिक्रमणांवर कारवाई

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेने वर्सोवातील कवठे खाडीवरील वर्सोवा ते लोखंडवाला परिसरास जोडण्यासाठी यारी रोड पूल बांधला जाणार आहे. हा पूल जोडण्यासाठी दोन्ही बाजूस सुमारे १२५ अतिक्रमणांचा अडथळा निर्माण झाला होता. मुंबई पालिकेच्या के पश्चिम वॉर्ड कार्यालयाने मुंबई पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयांच्या सहाय्याने ही अतिक्रमणे दोन टप्प्यात पाडल्याने पुलाच्या बांधकामातील अडथळे दूर झाले आहेत.

मुंबई पालिकेकडून यारी रोड पूल बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण सुमारे १२५ अतिक्रमणांमुळे बांधकामात अडथळे निर्माण झाले होते. त्यातील एका बाजूस ५५ अतिक्रमणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील जमिनीवर झाली होती. पुलाच्या दुसऱ्या बाजूस वनखात्याच्या जमिनीवर ७० अतिक्रमणे झाली होती. या अतिक्रमणांवर दोन टप्प्यांत कारवाई करण्यात आली. त्यासाठी परिमंडळ चारचे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणे पाडण्यात आली. मुंबई पोलिसासह जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या सहकार्याने कवठे खाडीवरील सुमारे ३४५ लांबीच्या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याचे 'के / पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_lAKQAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬