[mumbai] - ६० लाखांच्या औषधांची जप्ती

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

संरक्षण दलासाठी तयार करण्यात आलेल्या औषधांची खुल्या बाजारामध्ये होत असलेल्या विक्रीप्रकरणामध्ये गुरुवारपर्यंत अन्न व औषध प्रशासनाने ६० लाख रुपयांची औषधे जप्त केल्याची माहिती हाती आली आहे. यामध्ये गुरुवारी विक्रोळी, घाटकोपर, दवा बाजार, मरिन लाइन्स येथील नव्या औषधविक्रेत्यांचा समावेश आहे. अमेरिका तसेच इंग्लड येथून यातील काही औषधे आयात करण्यात आली असून छापा टाकून ताब्यात घेतलेल्या औषधांमध्ये प. बंगाल तसेच मध्यप्रदेशमधून आलेल्या औषधांचाही समावेश असल्याचे अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणामध्ये औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्याही रडावर आल्या असून त्यांचीही चौकशी होणार आहे. या प्रकरणामध्ये कंपन्याना औषधांच्या विक्रीसाठी मार्केटिंग टीमला जी टार्गेट देण्यात येतात, त्या ती गाठण्यासाठीही या प्रकारे संरक्षण दलासाठी तयार करण्यात आलेल्या औषधांची विक्री अवैध प्रकारे करण्यात आल्याची एक शक्यता तपासादरम्यान पुढे आली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/psLL_QAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬