[mumbai] - Maratha Reservation: ‘मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र प्रवर्ग का?’

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

'मराठा ही स्वतंत्र जात नसून, मराठा हे कुणबीच आहेत आणि त्यामुळे मराठा समाजही इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) असायला हवा होता, असे महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाने म्हटले आहे. मग मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याऐवजी त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग करण्याची गरज नव्हती. मात्र, ओबीसींना दुखवायचे नाही म्हणून राज्य सरकारने हा घाट घातला. असे करून सरकारने या समाजाला विशेष वागणूक देत एकप्रकारे स्वतंत्र जात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे', असा आरोप जनहित याचिकादारांतर्फे राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात केला.

मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गांतर्गत सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने नोव्हेंबर-२०१८मध्ये केला. त्याविरोधात जनहित याचिका करणाऱ्या उदय भोपळे यांच्यातर्फे अणे यांनी युक्तिवाद मांडला. राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) या जाती आहेत, तर 'सामाजिक आणि शैक्षणिक मागास' हा वर्ग आहे. त्याआधारे आरक्षण देणे चुकीचे आहे. या वर्गात अनेक जातीचे नागरिक समाविष्ट होऊ शकतात. त्यामुळे एकाच समाजासाठी असा वर्ग करणे अवैध आहे. सरकारी नोकऱ्या व शिक्षणातील पुरेशा प्रतिनिधित्वाचा मुद्दा पहिला तर मग भविष्यात ब्राह्मणही आरक्षण मागतील', असा यक्तिवाद अणे यांनी मांडला. त्यांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने आज, शुक्रवारीही सुरू राहणार आहे....

फोटो - http://v.duta.us/feKs3QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/us-6IwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬