[nagpur] - ‘तेलंगणा’मध्ये आढळला मृतदेह

  |   Nagpurnews

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

नागपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या तेलंगणा एक्स्प्रेसच्या एस-९ बोगीत एका वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खबबळ उडाली. विशेष म्हणजे, या बोगीत एकही प्रवासी नव्हता.

१२४२७ दिल्ली-हैदराबाद तेलंगणा एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली. या गाडीच्या एस-९ बोगीत एकही प्रवासी नव्हता. फक्त एका व्यक्तीचा मृतदेह होता. याबाबतची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांना मिळाली. त्यांनी रेल्वे डॉक्टर तसेच लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. रेल्वे डॉक्टरांनी तपासून वृद्धाला मृत घोषित केले. यावेळी लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवच्छिेदनासाठी पाठविले. मृताच्या अंगात लाल रंगाचे स्वेटर आणि कत्थ्या रंगाची फुलपॅण्ट होती. ६० ते ६५ वर्ष वयोगटातील असून अद्याप ओळख पटली नाही. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल बाबर शेख करीत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/P6a7WAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬