[nashik] - ‘आम्हाला शाळा पाहिजे’ प्रथम

  |   Nashiknews

\Bबालनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण\B

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाट्य परिषदेची नाशिक शाखा आणि सुविचार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालनाट्य स्पर्धेत महात्मा गांधी हायस्कूल, इगतपुरीच्या 'आम्हाला शाळा पाहिजे' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या 'रिले' नाटकाने द्वितीय, तर विद्या प्रबोधिनी प्रशालाच्या 'ताटी उघडा' या नाटकाने तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुविचार हॉस्पिटलचे डॉ. अविनाश आंधळे, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, नाशिक नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, राजेंद्र जाधव, परीक्षक प्रणव प्रभाकर, डॉ. राजीव पाठक, श्रीया जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

दिग्दर्शनासाठी प्रथम विजय कुमावत (आम्हाला शाळा पाहिजे), द्वितीय धनंजय वाबळे (रिले), तृतीय सागर रत्नपारखी (ताटी उघडा), रंगभूषेचे पहिले पारितोषिक अनिता गायकवाड (रिले), वेशभूषेचे प्रथम नुपूर सावजी (ताटी उघडा). नेपथ्य प्रथम राजबहादूर हितांगे (रिले), द्वितीय अशोक इंपाळ (आम्हाला शाळा पाहिजे), तृतीय नुपूर सावजी (ताटी उघडा). प्रकाशयोजनेचे प्रथम कृतार्थ कन्सारा (रिले), द्वितीय प्रसाद प्रतीक (सेल), तृतीय आकाश सागर (थेंबांचे टपाल). संगीत प्रथम अभिजित दळवी (आम्हाला शाळा पाहिजे), द्वितीय राहित सरोदे (रिले), तृतीय रोहिणी आदित्य (थेंबांचे टपाल) तर लेखनासाठी प्रथम धनंजय वाबळे (रिले), द्वितीय सुजित जोशी (ताटी उघडा), तृतीय विजय कुमावत (आम्हाला शाळा पाहिजे) तर अभिनयासाठी मुले शर्वायू ढेमसे, वरुण, कृष्णा राजपूत तर मुली लावण्या जाधव, युगा कुलकर्णी, आर्या देशपांडे यांनी यश संपादन केले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7BMKpgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬