[nashik] - गांजा विक्रीला विराम, पण पिणारे भरमसाट

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

गोदाघाट परिसर झिंग आणणाऱ्या नशिल्या पदार्थांच्या सेवनाचा अड्डाच बनला आहे. एकीकडे भक्तीचा जागर होत असताना दुसरीकडे नशेत डुबणारे असे चित्र येथे सध्या दिसत आहे. गांजासारख्या नशिल्या पदार्थांची पंचवटीत सध्या विक्री होत नसली तरी शहराच्या इतर ठिकाणांहून हे पदार्थ गोदाघाटावर आणले जातात. गांजा पिणारे जुन्या नाशिकमधील काही ठिकाणांहून गांजा विकत आणून टोळक्या टोळक्यांनी गोदाघाटाच्या परिसरात गांजा पित असल्याचे चित्र दिसते.

तीर्थस्थान म्हणून प्रसिध्द असलेल्या गोदाघाट परिसराला अंमली पदार्थांच्या नशेचा विळखा बसलेला आहे. रामसेतू पुलाच्या खालच्या भागात, दिंडोरी नाक्यापासून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या दक्षिण रस्त्याजवळ, पेठफाट्याजवळ या ठिकाणी पूर्वी थेट गांजा विक्री होत होती. ती सध्या बंद असल्याचे दिसते. पंचवटीत सध्या गांजा विक्री होत नसली तरी गांजा पिणारे थेट भद्रकाली आणि वडाळा नाका पुलाखालच्या परिसरातून गांजा घेऊन गोदाघाट परिसरात पित असल्याचे दिसते....

फोटो - http://v.duta.us/BqnNbQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/W1VE_AAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬