[nashik] - मुद्दा मिळेल का मुद्दा?

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणतीही निवडणूक म्हटली की प्रचार आपसूकच येतो. हाच प्रचार करण्यासाठी राजकीय पक्ष व नेत्यांना हाती असावे लागतात मुद्दे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या याच मुद्द्यांचा शोध विविध राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांकड़ून घेतला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे थेट जनतेच्या दरबारात जाऊनच मुद्दे शोधले जात आहेत. पक्षासोबतच काही इच्छुकांनी व्यक्तिगत पदरमोड करून सर्वेक्षणे हाती घेतली आहेत. स्वत:च्या क्षमतेचे आकलन करतानाच कोण, किती पाण्यात आहे याचाही अंदाज या माध्यमातून शोध घेतला जात आहे.

निवडणुकीच्या प्रचार काळात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विषयांची वानवा नसते. परंतु, स्थानिक पातळीवर प्रचार करताना स्थानिक विषयांना हात घालावाच लागतो. लोकांशी ‘कनेक्ट’ दिसला तर त्याचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळेच लोकांना काय वाटते हे जाणून घ्यावे लागते. जाहीरनामा बनविण्यासाठीही त्याचा उपयोग होत असतो. नेमकी हीच बाब शोधण्यासाठी इच्छुकांनी काही खासगी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी चालवली आहे....

फोटो - http://v.duta.us/HZVLXgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/cYQ78wAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬