[nashik] - राष्ट्रवादीतर्फे 'ठाकरे'चा विशेष शो, भुजबळही पाहणार

  |   Nashiknews

नाशिक :

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचा एक विशेष शो राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी ठेवण्यात आला आहे. शिवसेना खासदार आणि या सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांच्या या सिनेमाचा शो राष्ट्रवादी आयोजित करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही वर्षांपूर्वी शिवसेनेला 'अखेरचा जय महाराष्ट्र' करत आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेदेखील हा सिनेमा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीचा हा खास शो रविवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता बिग बझार येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी या विशेष शोला उपस्थित असतीलच, शिवाय काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रण आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे यांनी या खास शो बद्दल माहिती दिली. ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बॅ. ए. आर. अंतुलेंपासून तर शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान राहिले आहे. शरद पवार यांनी सतत जात, धर्म आणि पक्षविरहित शिकवण दिली आहे....

फोटो - http://v.duta.us/gyU0zwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PTnxvwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬