[nashik] - शाळांमध्ये २८ पर्यंत ‘स्वच्छतेचा जागर’

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार व्हावे व मुलांमार्फत स्वच्छतेचा प्रचार घरोघरी व्हावा यासाठी सर्व महापालिका शिक्षण विभाग सरसावला आहे.

शहरातील सर्व खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळांमध्ये 'स्वच्छ हवा व स्वच्छतेचा जागर' हा उपक्रम २८ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. सप्तरंग बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

देशाची पुढची पिढी स्वच्छतेविषयी अधिक जागृत असावी, यासाठी विविध उपक्रमांतून शाळांकडून प्रयत्न करण्यात येतात. 'स्वच्छ हवा व स्वच्छतेचा जागर' या उपक्रमांतर्गत वर्गामध्ये वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ हवा व घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व व कचरा वर्गीकरणाचे फायदे सांगावे, अशी सूचना शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी शाळांना दिल्या आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_TgZzQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬