[pune] - पश्चिम बंगालचा आंबेमोहोर तांदूळ पुण्यात

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पश्चिम बंगालमधून सुवासिक आंबेमोहोर तांदळाची पुण्याच्या मार्केट यार्डात आवक सुरू झाली असून, तो पुणेकरांच्या पसंतीस उतरला आहे. अन्य सुवासिक तांदळाच्या तुलनेत पश्चिम बंगालच्या आंबेमोहोर तांदळाला मागणी वाढली आहे. परिणामी, मागणी अधिक असली तरी त्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात सध्या या तांदळास प्रति क्विंटलला ६००० ते ६५०० रुपये भाव मिळत आहेत.

‘नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, देशातील सर्व प्रकारातील नवीन तांदळाची बाजारात आवक होत आहे. सुवासिक तांदळात बासमती, इंद्रायणी, आंबेमोहोर, कालीमुछ, चिन्नोर आदी प्रकारातील तांदूळ उपलब्ध आहेत. बाजारात गेल्या वर्षीपासून पश्चिम बंगालहून सुवासिक आंबेमोहोर तांदळाची आवक सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये हा तांदूळ ‘जवापूâल’ या नावानेही ओळखला जातो. गेल्या वर्षी तुरळक प्रमाणात आवक होत होती. यंदा आवक वाढली असून सुवास आणि गोडव्यामुळे ग्राहकांकडून या तांदळाला मागणी वाढली आहे,’ अशी माहिती तांदळाचे व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी दिली....

फोटो - http://v.duta.us/4vk4LAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/quKYxgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬