[nagpur] - congress: मोदींवर टीका करताना हरिभाऊ राठोड यांची जीभ घसरली!

  |   Nagpurnews

यवतमाळ: एकेकाळचे भाजपचे माजी खासदार आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड यांची भर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जीभ घसरली. राठोड यांनी मोदींवर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि उपस्थितांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली.

यवतमाळ येथे एका सभेत बोलताना हरिभाऊ राठोड यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. पाकिस्तानमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकवरूनही त्यांनी केंद्र सरकारला घेरले. एअर स्ट्राइकमध्ये ३५० दहशतवादी मारले गेल्याचा दावा भाजपवाले करत आहेत. मात्र त्यात तथ्य नाही. या हल्ल्यात एक मुंगीही मारली गेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

भाजप सध्या पाकिस्तानवरील हल्ल्याचा निवडणुकीसाठी उपयोग करून घेत आहे. भावनिक राजकारण करण्याचं काम भाजपकडून सुरू असून त्यासाठीच मोदींचा उदोउदो केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी बोलण्याच्या ओघात त्यांनी मोदींवर खालच्या पातळीवर कमेंट केल्याने उपस्थित कार्यकर्तेही अवाक् झाले....

फोटो - http://v.duta.us/jfKIHwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1K7EbAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬