[pune] - parth pawar: पार्थने लोकसभा लढवावी, शरद पवार यांची इच्छा

  |   Punenews

पुणे: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा असतानाच खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पार्थ यांनी मावळमधून लोकसभेला उभं रहावं, अशी इच्छा बोलून दाखवलीय. त्यामुळे पार्थही राजकारणात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे संकेत दिले. पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढवावी, अशी मावळमधील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मावळ मतदारसंघातील काही भागात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. त्यांनीही पार्थ यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही कुटुंबामध्ये चर्चा केली. तसेच एका कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढवावी, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला. यावेळी नव्या पिढीला संधी देण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे बारामती येथून सुप्रिया सुळे या निवडणूक लढवतील. तसेच मावळमधून पार्थ पवार यांना संधी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. असे पवार यांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/ElYoUwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/jZ8k0wAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬