[pune] - sharad pawar : ... म्हणून शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पवार घराण्यातील मतभेद, बदललेली राजकीय परिस्थिती याचबरोबर राज्यसभेची गमवावी लागणारी जागा या तीन प्रमुख कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत दाखविलेले स्वत:बद्दलच्या अनिश्चिततेचे धोरण कायम ठेवल्याचेही दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार सक्रिय झाले होते. रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असून, पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. रोहित पवार भविष्यात पवारांचा वारसा चालविणार, अशी चर्चाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली होती. या चर्चेमुळे अजित पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अस्वस्थ झाले होते. त्यातच, पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघामधून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली होती. पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघाचे दौरे सुरू केले होते. हे सुरू असतानाच, पवार यांनी अचानक माढ्यातून आपली स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. त्यापूर्वी, पवारांनी पुणे लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढविता येईल का, याची चाचपणी केली होती. आपली उमेदवारी जाहीर करतानाच, या लोकसभा निवडणुकीत आपण आणि आपल्या कन्या सुप्रिया सुळे हे दोनच पवार असतील, असे सांगण्यासही पवार विसरले नव्हते. साहजिकच, पार्थ पवार यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच अडचणीत आल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये पसरली होती. शरद पवार यांनी हे स्पष्टीकरण दिल्यानंतरही पार्थ पवार यांचे मावळ लोकसभा मतदारसंघातील दौरे सुरूच होते. अजित पवार यांनीही मावळमधील विविध पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांशी संवाद साधून तयारी कायम ठेवली होती. पवार यांनी माढ्यातून उमेदवारी मागे घेण्यामागे पवार कुटुंबीयांतील तणाव हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. पवार यांनी माघार घेतल्यामुळे आता पार्थ पवार यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील वाटचाल सुकर झाली असल्याचे मानले जाते....

फोटो - http://v.duta.us/VO0TdwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/gSrWlwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬